Maharashtra SSC Result 2027 बद्दल थोडक्यात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे दरवर्षी इयत्ता 10वी म्हणजेच SSC (Secondary School Certificate) परीक्षा घेते. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात.
2027 च्या SSC लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होऊन 15 मार्च 2027 रोजी संपणार आहेत. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होऊन मंडळ निकाल जाहीर करते. निकालाची अधिकृत तारीख मंडळ स्वतः जाहीर करते; ती जाहीर होताच आम्ही या पेजवर अपडेट करू.
या वेबसाइटवर तुम्हाला SSC result 2027 Maharashtra board संबंधित निकालाची अपेक्षित वेळ, अधिकृत वेबसाइट्स (mahresult.nic.in, sscresult.mkcl.org), निकाल पाहण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत, गुणपडताळणी आणि पुरवणी परीक्षेची माहिती सोप्या मराठीत मिळेल.